माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रांत मराठी मंडळींबरोबर इतर भाषिक ही काम करीत आहेत. हेच टेलिकॉम सेक्टर मध्येही (दळणवळण क्षेत्रातही) आहेच
ढोबळमानाने दळणवळण क्षेत्राचे उदाहरण द्यायचे झाल्यास-
भ्रमणध्वनींच्या ध्वनिलहरींचे प्रक्षेपण करण्यासाठी उंच मनोऱ्यांची आवश्यकतः (बेस स्टेशन) असते. ह्या मनोऱ्यांना लागणारी साधन सामुग्री बनवणारी नोकिया, इरिक्सन व मोटोरोला ह्या अग्रेसर संस्था आहेत. भारतात फक्त नोकिया व इरिक्सन व कुठे कुठे मोटोरोला ह्या संस्थांची सामुग्री बसवण्यात आलेली आहे. नोकियाचा वाटा सर्वात जास्त आहे.
ही झाली पार्श्वभुमी-
बिपीएल ह्या सर्व्हिस प्रोव्हायडरने (मी २००४ सालातली गोष्ट करतोय) मुंबई व महाराष्ट्रासाठी जवळपास सर्वच मराठी मंडळी अभियंते म्हणून कामांवर ठेवली होती. सर्वच मराठी असूनही त्यांचे कार्यकालीन व्यवहार नोकियाच्या नियमांप्रमाणे इंग्रजीतून व्हायचे. सर्वच कॉन्फ़रन्सेस, गाठीभेठी व प्रेझेंटेशन इत्यादीत इंग्रजी अनिवार्य !
मग मराठी मुले नोकरीत असूनही इंग्रजीचाच प्रसार होणार ना ?
संचार तंत्रज्ञानाचा विषय भाटकरांनी मांडला म्हणून हे उदाहरण येथे दिले.
ह्या परिस्थितीत मराठीचा प्रचार होणार कसा ? बेस स्टेशन्स वर काम करणारे अभियंते गप्पा मारताना भले मराठीत मारतील पण जी विज्ञानातील परिभाषा द्यावी लागते ती ते मराठीत कशी देणार ? त्यातूनही एखाद्याने प्रयत्नपूर्वक मराठी परिभाषा आणली तरी इतरांपर्यंत तिचा प्रसार होईस्तोवर बराच काळ जाईल......
नाईलाजाने म्हणावे लागते आहे; कार्य एकंदरीत कठीणच आहे !