खरेतर कोणतीही नवीन सूचना करण्यात आलेली असताना एकदम गुन्हा दाखल करण्यात यावा हे हास्यास्पद वाटते. याबाबतीत म. गांधींनी सुद्धा सांगितले होते की राष्ट्रगिताच्या वेळेस उभे राहणे हा पाश्चिमात्य शिष्टाचार आहे आणि भारतीयांवर याची सक्ती करणे अयोग्य ठरेल.

हे बोलणे म्हणजे.. फक्त चोरीच केली आहे कोणाचा खून तर नाही ना केला.. अशा आशयाचे आहे. राष्ट्रगीत चालू असताना कोणतीही हालचाल न करता सावधान मध्येच उभे राहीलेच पाहीजे. नाहीतर राष्ट्रगीत आणि फिल्मी गीत यात फरक काय? उद्या कॉलेजच्या गंदरिंग्जमध्ये राष्ट्रगीतावर रेकॉर्डडान्स करायलाही लोकं कमी करणार नाहीत. 

मूर्तिंनी नक्की काय केलं हे माहीती नाही आणि त्यांच्यावर नक्की कोणता गुन्हा दाखल केला हे ही माहीती नाही पण राष्ट्रगीताचा अवमान झाला असेल तर तो गुन्हा व्यक्तीसापेक्ष न राहता घटनासापेक्ष होतो.