एखाद्या गोष्टीचा किंवा कथनाचा विपर्यास करुन सतत प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात राहणे ही संकल्पना हल्ली सरकारी खात्यांतूनही बघायला मिळेल.
नारायण मुर्तींनी कोणत्या/कुठल्या संदर्भात वरील वाक्य उच्चारले असावे हे अत्यंत मोघमपणे म. टा. मध्ये आले आहे.
दहा मुलांना राष्ट्रगित म्हणावयास उभे केले व त्यांच्यातल्या एखाद्याने चुकीचा उच्चार केला असेल व त्यासंदर्भात नारायणमुर्तींनी हे वाक्य उच्चारले असल्यास राष्ट्रगित म्हणणाऱ्या मुलाला (पकडणे शक्य नसल्यास/पकडून प्रसिद्धीझोतात येण्याची शक्यता नसल्याने) सोडून नारायणमुर्तींच्या मागे पोलीस लागले असल्यास कोणी सांगावे ?
सकाळी ही बातमी वाचताच हेच डोक्यात आले.
ज्या भारतीय उच्चायुक्ताने तिरंगी रंगाचा/आकाराचा केक बनवला/बनवून घेतला त्याला काहीच शिक्षा नाही......
गदारोळ मात्र घाइघाईत केक कापणाऱ्या सचिन विरुद्ध !
अर्थात ह्याचा अर्थ कोणा देशद्रोह्याला सोडून द्या किंवा अश्या कोणावर कारवाई करु नका असे नाही.
परंतु २७ जाने/१६ ऑगस्टला रस्त्यांवर पायदळी तुडवले जाणारे किंवा फाटलेले राष्ट्रध्वज किंवा
जॉनी लिव्हरने दाउद इब्राहीमच्या वाढदिवसाच्या पार्टीत केला तसा राष्ट्रगीताचा अवमान
ह्या छायाचित्रांत दाखवलेले प्रकार किंवा नारायण मुर्ती / सचिन ह्या प्रकारांची एकमेकांशी तुलना कशी करता येईल ?
प्रसिद्धी झोतात चमकण्यासाठी केलेला म्हैसुर पोलिसांचा हा एक प्रयत्न असावा. प्रसिद्धीमाध्यमांनी (व आपणही) झाल्या प्रकाराबद्दल जास्त डोकेफोड न करता दुर्लक्ष केल्यास त्यातला बाष्फळपणा हवेतच विरघळून जाईल.