वरील चर्चेच्या अंती सर्वांचे गैरसमज दूर झाले असे समजायला हरकत नाही. तरी माझी एक मल्लिनाथी (की अद्वैतुल्लाखानी?):--
माझे स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, आणि माझी मातृभाषाही मराठीच आहे. आणि ज्या शाळेतून माझे शिक्षण झाले, तेथे आज़ही मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध आहे. -चक्रपाणि.
मी ज्या वस्तीत लहानपणी रहात होतो, तिथून रयत शिक्षणसंस्थेने चालवलेली मराठी शाळा अडीच किलोमीटरवर, तर हिंदी-उर्दू शाळा सहा किलोमीटरवर होती. इंग्रजी माध्यमाची कॉन्व्हेंट शाळा फक्त शंभर फुटावर. अर्थात लहान मुलांना लांब पाठवणे उचित नसल्याने आमच्या वस्तीतील सर्व जातिधर्माची, विविध मातृभाषा असलेली, वेगवेगळ्या सामाजिक स्तराची सर्व मुले व मुली इंग्रजी माध्यमात शिकली. शाळा फार उत्तम होती अशातला प्रकार नाही. आमच्या शाळेचा एकही विद्यार्थी अगोदरच्या ५० वर्षात गुणवत्ता यादीत आलेला नव्हता. मराठीचे सोडले तर उरलेले सर्व शिक्षक सदर्न इंडियन किंवा अँग्लो-इंडियन. शाळेचे माजी विद्यार्थी जगभर विखुरलेले. ते शाळेसाठी भरपूर देणग्या पाठवीत. शाळेच्या वाचनालय-वजा-ग्रंथालयात मुले सतत दाटीवाटीने वाचत बसलेली असायची. तसल्या शाळेत शिकूनसुद्धा घरी मराठी वातावरण असल्याने आयुष्यात कुठलीही कमतरता भासली नाही.
'चक्रपाणिं'ची मातृभाषा मराठी आणि शाळा पण मराठी हे मला वाटते, अपघाताने झाले. आमच्या नशीबात असा अपघात नव्हता!