काही घटना गोष्टी या संदर्भात एकत्रीत लिहाव्याशा वाटल्या: (यात नारायण मुर्तींचे एक भांदवलशाही उद्योजक म्हणून कर्तुत्व कमी करायचाउद्देश नाही)

  1. अफझल गुरूच्या फाशीवर निर्णय घेत नाहीत म्हणून बाळ ठाकऱ्यांनी राष्ट्रपतींवर टिका केली - त्याचा लगेच भब्रा झाला, असे कसे राष्ट्रपपतींच्या विरोधात ठाकरे बोलले. (वास्तवीक गृहमंत्रालयामुळे, राष्ट्रपतींचे हात घटनेने बांधले आहेत तरी काँग्रेस आरडाओरडा करत होती). आता कसे शांत. कारण अर्थातच "अर्थस्य पुरुषोः दास:"
  2. आता बातमी प्रमाणे नारायण मुर्तींना गोऱ्या त्वचेपुढे राष्ट्र्गीत म्हणायची लाज वाटली - त्यांची लाज त्यांच्यापाशी, कारण काही असो, राज्यघटनेप्रमाणे आणि कुठल्याही सुजाण भारताबद्दल प्रेम (अभिमान हा शब्द मी वापरत नाही..) असलेल्याला ह्या गोष्टीचा राग येयला पाहीजे असे वाटते. ज्या भारतामुळे मुर्ती श्रीमंत झालेत त्या भारताबद्दल एक देश म्हणून किमान क्ऱ्तज्ञता पण नसल्याचे यातून जाणवते.
  3. नारायण मुर्तींचा भांडवलवाद हा त्यांच्यातल्या कम्युनीस्ट विचारसरणी असतानाही जेंव्हा रशीयातच तुरूंगात राहावे लागले तेंव्हा जागृत झाला.
  4. अमेरीकेत नुअसतेच राष्ट्रगीत होते नाही तर "वन नेशन अंडर द गॉड.." म्हणणारी त्यांची प्रतिज्ञापण म्हणली जाते आणि छतीवर हात ठेवून म्हणताना कोणि लाजत नाही.
  5. अशा माणसाला फक्त "आऊटसोअर्सिंगचुया" काळात बाहेरच्या कंपन्यांची कंत्राटे तशा कामासाठी काळ योग्य आहे म्हणून मिळवून मोठा झालाय म्हणून राष्ट्रपतीचा उमेदवार करण्याचा फक्त भारतीय दास्य मनोवृत्तीच विचार करू शकते. असा विचार बिल गेटस बद्दल पण झाला नाही.