खानचाचा,

'चक्रपाणिं'ची मातृभाषा मराठी आणि शाळा पण मराठी हे मला वाटते, अपघाताने झाले.  आमच्या नशीबात असा अपघात नव्हता! 

हे विधान तितकेसे पटले नाही. अपघातापेक्षा (सु)दैवाचा भाग म्हणता येईल कदाचित. पण माझे शालेय शिक्षण ज्या विद्यासंकुलात झाले, तेथे मराठी, इंग्रजी आणि गुज़राती माध्यमाच्या शाळा एकाच संकुलात होत्या; अज़ूनही आहेत. पालकांनी ठरवले असते, तर मलाही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता आले असते, नाही असे नाही. मला असे वाटते की मातृभाषेतून मूलभूत शिक्षण घेण्याची उपलब्धी असताना तिचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीने आपल्याच मातृभाषेतून शिक्षण घेणे, ही सकारात्मकता आहे. आणि अशी उपलब्धी नसताना शिक्षणासाठी इतर पर्याय स्वीकारणे, यात काहीसुद्धा गैर नाही; कुणाचे नुकसानही नाही. आणि तुमच्या तसल्या शाळेत शिकूनसुद्धा घरी मराठी वातावरण असल्याने आयुष्यात कुठलीही कमतरता भासली नाही या विधानावरून याची प्रचिती येतेच.

तुमचा अनुभव येथे सगळ्यांसोबत वाटून घेण्यासाठी अनेक धन्यवाद.