या चित्रणामुळे चित्रपट पुन्हा एकदा पाहिल्याचा आनंद मिळाला. शेवटी तालिबला त्याच्याच सैनिकांकडून गोळ्या घातल्या ज़ातात (तेही त्या सैनिकांच्या मनाविरुद्ध, केवळ हुकमाची अंमलबजावणी म्हणून!) तो प्रसंग आणि तालिब स्वत:च्या मुलीला नि नातवाला - ते डोळ्यांसमोर पाहत असूनही - एखाद्या परक्यासारखा भेटतो आणि एकही अक्षर बोलू शकत नाही, हे प्रसंग अधिकच टोचणारे!