मातृभाषा मराठी आणि शाळा पण मराठी हे मला वाटते, अपघाताने झाले.

अशा गोष्टी अपघाताने होत नाहीत. माझ्या घरापासून एक इंग्रजी माध्यमाची शाळा केवळ ५ मि. तर दुसरी ७-८ मि. आहे. यापैकी एका इंग्रजी शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक आमचे सख्खे शेजारी (next door neighbour) होते. ते माझ्या आई वडिलांना तुमच्या मुलांना माझ्या शाळेत घाला असे बोलता बोलता सांगत. माझ्या वडिलांना आम्ही मराठी शाळेतच गेलेलो हवे होतो.  माझी मराठी शाळा सुमारे २० मि. वर होती. जाण्या येण्यास चालत जाण्याचाच मार्ग होता. अशा गोष्टी अपघाताने होत नाहीत असे वाटते.