सर्व गीताप्रेमीना.

दिनांक ३० मार्च आणि ३ एप्रिल रोजी कळवल्या प्रमाणे, १४ एप्रिल, शनिवार, सायंकाळी, बरोबर ५.३० वाजता, वनिता समाज दादर ( पश्चिम ) मुंबै, येथे श्री. चंद्रकांत (श्रीकृष्ण ) जोशी यानी, " रितायर्ड पर्संन्स असोसिएशन, तर्फे, "श्रीमद्गभगवद्गीता एक अनोखे पठण " हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, सुमारे २०० गीताप्रेमींच्या उपस्थितीत सादर केला.

सौ.आपटे यानी घेतलेया मुलाखतीत, श्री. जोशी यानी, गीता कधी, कशी, पाठ केली, वगैरे प्रश्नांची उत्तरे दिली. नंतर सुमारे ४० श्लोक क्रमांक विचारले गेले. श्री. जोशी यानी ते श्लोक बिनचूक म्हणून दाखवले. वेळेच्या मर्यादेमुळे कार्यक्रम ७.०० वाजताच संपवावा लागला. त्यामुळे काही गीताप्रेमींची निराशा झाली. हा कार्यक्रम साधारण ३ तासांचा ( २०० गीताप्रेमी असलेतर ) असावा.

पुढील कार्यक्रम ९ एप्रिल रोजी, ठाणे येथे होणार आहे. वेळ आणि ठिकाण नंतर कळविण्यात येइल.

गुरुजी