निर्माता कोटीच्या कोटी रूपये लावतो... साधं गणित असतं... जो तारा विकाऊ तो तारा घ्यायचा की पैसे बुडणार नाहीत. जातीपातीचा काही संबंध नाही... ब्राह्मण असून समीर धर्माधिकारी जास्त विकाऊ ठरत नाही आणि अल्पसंख्यांकाच्यातला असून शाहरूख ला कोणी कमी मानत नाही...  हे झालं चेहऱ्यांच्या बाबतीत. बाकी दिग्दर्शन व तांत्रिक बाबींमधे आपली लायकी सिद्ध करा आणि मगच पैसे मिळवा अशी परिस्थिती आहे. 'श्रमिक' (लेबर) लोकांची गोष्ट वेगळी... त्यांच्या युनियन्स आहेत. त्या एकापरीने चांगल्याही आहेत पण साधं धोतरही न नेसवता येणारा माणूस युनियनचं कार्ड मिळाल्याने ड्रेसमन म्हणून येतो माझ्याकडे तेव्हा माझं डोकंच सरकतं. आणि अनेकदा हा मराठे मुलगाच असतो. भैय्ये, मलबारी हे सगळे भरपूर काम करतात. कामाची लाज आपल्या मराठी पोरांनाच वाटत असते. असो हे युनियनवाल्यांचं आरक्षण आहेच. आरक्षणापेक्षा ते संरक्षण आहे, पण ते तेवढेच पुरे आहे.