असाच एक निधी दुष्काळाच्या माराने खचलेला व सावकाराच्या जाळ्यात हतबल झालेल्या, अद्याप जिवंत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी खर्च होऊ शकतो. पण ते कठीण काम आहे. त्याचे वार्तामुल्य किती असेल याबाबत कल्पना नाही.

शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थीतीला तोंड द्यावे लागत आहे याची कल्पना असती तर त्यांच्या विषयी काळजी वाटली असती. त्यांना भ्याड म्हणनं तार्कीक अर्थानं जरी योग्य असलं तरी ते मनाला पटत नाही. गेली अठरा वीस वर्षे सावरलेलं आपलं घरदार , आपला संसार असाच अर्ध्यावर सोडून कुणाला जावंसं वाटेल? त्यातल्या त्यात शेतकरी म्हणजे आपल्या घर, जमिन गाव यांच्याशी जास्तच जुळलेला असतो.

नीलकांत