खेळाडूंना मदत म्हणून पुढे येताना हा विचार डोक्यात आल्याखेरीज राहत नाही की, हेच खेळाडू पुढे आल्यावर समाजाचे ऋण कसे फेडतील ? जाहिराती घेण्यास कोणाचीही ना नाही परंतु देशाचे नांव कितपत उज्ज्वल करतील ही शंका आहेच. सर्वच खेळांना एक समान निकष लावता येत नाही हे मलाही समजते. अंजली भागवतने घेतलेली खांद्यावरची पताका इतर नेमबाजांनी पुढे नेल्याचीही उदाहरणे आहेतच. परंतु क्रीडा क्षेत्रांतल्या नवोदितांना पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून लिएंडर पेस, सानिया मिर्झा पासून ते कालच्या दिनेश कार्तिक कडून पैशांचा ओघ खेचून आणता येईल/अशी परिस्थिती निर्माण करता येईल. प्रत्येक खेळाडू जो जाहिरातींद्वारे वा खेळांव्यतिरिक्त इतर मार्गांनी पैसे खेचतो त्याच्याकडून नवोदितांना पुढे येता यावे म्हणून ठरावीक रक्कम /निधी वसूल करून घेताही येईल.
पण......
ह्या गोष्टींचा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी किंवा त्यांच्या पिचलेल्या परिस्थितीशी संबंध जोडणे म्हणजे पादरामायणाचा संबंध असल्यासारखे वाटते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एकूणच वेगळा विषय आहे.
शेतात फक्त नगदी/रोख पिके घ्यायची व जमिनीचा कस कमी होइस्तोवर त्या गोष्टींकडे लक्ष पुरवायचे नाही.
जास्त उत्पन्नांच्या मोहाने शेणखतासारख्या नैसर्गिक खतांचा वापर सोडून रासायनिक खतांचा सढळहस्ते उपयोग.
शेतातल्या विहिरींतून भरमसाठ पाण्याचा उपसा व त्याचा अपव्यव (स्प्रिंकलर्स सिस्टम लावण्यास टाळाटाळ !)
सरकारी मदतीवर पुर्णपणे अवलंबून स्वतःचा विकास स्वतः न करण्याची मनोवृत्ती. (उदा: कांदा रस्त्यावर फेकू परंतु त्यासाठी गोदामे बनवून तो जास्त दिवस कसा टिकवायचा ह्यावर विचार नाही करणार )
दुष्काळ वा सावकार सोडल्यास अशी कित्येक कारणे त्यांच्या आत्महत्यांच्या मागे आहेत.
अर्थात त्यावर विचार करूच नये असे नाही पण संग्राहक ह्यांनी जो मुद्दा मांडला आहे - जलतरण पटूला मदतीचा हात पुढे करण्याबाबत- त्याच्याशी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा किंवा तत्सम इतर कुठलाही विषय जोडणे म्हणजे विषयांतर करणे असा आहे- असे मला वाटते.