एकूण तरुणवर्गावर अनेक गुन्हे लादले जातात त्यात प्रेम करणे हा गुन्हा येतो.

कधी परीक्षेत नापास झाला म्हणून कधी पळून जाऊन लग्न केलं म्हणून, कधी

स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या यासाठी समाज अशा लोकांना वाळीत टाकल्या

सारख्या नजरेने बघतो.

१२०० रु दंड भरू शकणारी मुले स्वतःच्या प्रेयसीशी अश्लील गोष्टी करण्यासाठी

बागेची किंवा तलावाची निवड करतील हे आश्चर्य. आणि हे कितपत शक्य आहे

फेरीवाले,भिकारी आणि बघ्यांची गर्दी यामध्ये मुला मुलींनाही काही मर्यादा असतील

अस वाटत.

आणि मर्यादा ओलांडणाऱ्या विरुध कारवाईच करायची झाली तर सर्वांनवरच झाली

पाहिजे त्यासाठी मलिका शेरावत आणि किती तरी नटी नटांनी अश्लील गोष्टी  दुष्य

दाखवली म्हणून तिला १०० रु. चा तरी दंड झाला का ?

तसं होणार नसेल तर १८-२२  वयोगटातल्या मुला मुलींना चित्रपटात दाखवल्या

जाणाऱ्या दुष्यातुन बाहेर  काढण्याची आवश्यकात आहे.

आई वडिलांच्या संस्कारापेक्षा घरा बाहेर घडणाऱ्या

किती तरी गोष्टी मुला मुलींची मानसिकता बदलण्यास जवाबदार ठरतात.

प्रेमी युगुलांना सार्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या एकांताला मर्यादा हवी आणि

तो घेऊ न देणाऱ्यांविरुध सुधा कारवाई व्हायला हवी. तो एकांत बोलण्यासाठी

हवा, भविष्याची स्वप्ने रंगवण्यासाठी हवा अश्लील गोष्टी करण्यासाठी नको.

यासाठी पोलिसांचा धाक नको पण मुला मुलींना जवाबदारीची जाणीव करून

द्यायला हवी. मग ही जाणीव होऊन हि कुठल्या मुलाचा मुलीच्या खांद्यावर हात असेल

तर लोकांची ओरड नको आणि एकाद्या मुलाच्या डोळ्यात प्रेयसी बद्दल प्रेम असेल

तर ते अश्लील भावनांच्या व्याखेत नको.

मर्यादा ओलांडणे हा गुन्हा आहे ( समाजाच्या दुष्टीने ) मग ती कुठली हि मर्यादा असो तसं

केलं म्हणून किती जणांची आयुष्य उध्वस्त झालेली पाहायला आणि वाचायला मिळतात.

एकांत मिळण्यासाठी स्वतः आणि स्वतःच्या प्रेयसीचा जीव धोक्यात घालणं कितपत

योग्य. या चुकीसाठी त्यांना आयुष्यभर किंमत मोजावी लागू नये.

यासाठी मुलांना अश्लील चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी पेक्षा

७ च्या आत घरात असे चित्रपट दाखवणे जास्त परिणाम कारक ठरतील अस वाटत.