समंजस व फक्त भावनेच्या आहारी न जाता केलेला प्रेम विवाह यशस्वी व जास्त सहजीवनास पूरक (पारंपरिक दाखवून केलेल्या विवाहाशी तुलना केल्यास) हे स्व:ताचे उदाहरण देऊन भावी प्रेमिकांची उमेद वाढविली आहे.

अभिनंदन अश्यांकरिता की आपण प्रेम केले ते भावी आयुष्याचा जोडीदार,सहप्रवासी निश्चित करण्यासाठी.

उद्दीश्ठ जर दीर्घकालीन व उद्दात (थिल्लरर्चे विरुद्ध) तर प्रेम करणे नक्कीच गुन्हा नाही.

दुर्दैवाने माध्यमे,महाविद्यालयीन विद्यार्थी बाह्याकर्शणासच प्रेम (?) असे गोंडस नाव देऊन दिशाभूल करीत आहेत.(पाहा कुठलीही "साबण मालिका)

उदासीन आत्ममग्न पालकवर्ग व तथाकथित समाजधुरीण याबाबत शहामृगी पवित्रा घेऊन अप्रत्यक्शपणे या प्रेमास खतपाणीच देत आहेत.

पालकांचा संस्कारपूर्ण सहभाग व माध्यमांचे जबाबदार पूर्वक समाजप्रभोधनच यात बदल घडवू शकेल अन्यथा खरे प्रेम नाहक बदनाम होत राहील हे नक्की......