अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिध्दच आहे. अक्कलकोट्ला स्वामींचे भव्य मंदिर, त्यांचा गावातील मठ इत्यादी स्वामी भक्तांना ठावुक असतीलच.
मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४ / ५ सहस्त्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिमच आहे.
अक्कलकोटचे दुसरे वैशिष्ठ म्हणजे तेथील आशियाखंडातील सर्वात मोठे असलेले शस्त्रागृह. तेथे सर्व जुने परंपरागत शस्त्रांचा साठा आणि प्रदर्शन तेथील भोसले राजगृहाने अजुनही जतन करुन ठेवलेले आहे. वेगवेगळे खड्ग, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुर्हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी इत्यादी चे वैविध्याने नटलेले प्रदर्शन पाहुन मन हरखुन जाते.
त्याच बरोबर तेथील राजकन्येचे लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रह मनाला मोहविते. तेथील राजपुरुषांचे सुंदर आणि रंगीत छायाचित्रे मनाला भुरळ पाडतात. ( एका राज्ञीचे लग्नानंतर काही दिवसातच निधन झाले, राजाने पुर्ण आयुष्य विधुरपणे काढले ही गोष्ट मनाला चटका लावते.)
त्यानंतर शिवपुरीचे दर्शन मनाला वेगळीच दिशा देते. तेथे हवन, यज्ञ आणि सकाळ-सांयकाळी पौरोहित्याचे महत्व पटवण्यात येते. ( नेमका शब्द विसरलो.)
काहीसे माहित नसलेल्या या स्थळांना भेट देण्याचे औचित्य आणि महत्व आगळे वेगळे आहे हे सांगणे न लगे.
द्वारकानाथ