बी आर टी योजना मुळात चांगली असावी असे वाटते.(माझा कोणीही नातलग बी आरटी चा कंत्राटदार नाही.) फक्त एक मूर्खपणा आहे तो म्हणजे बी आर टी मार्ग बनवण्यासाठी मूळ महामार्ग रुंद न करता त्यातच दोनाचे तीन भाग करुन एक(मधला) भाग बी आर टी ला दिला आहे. त्याने इतर वाहनांच्या रस्त्यावर बसमुळे होणारी कोंडी तर कमी झाली हो, पण रिक्षा,कंपन्यांच्या खाजगी बस, रा. प. म. च्या लाल गाड्या यांचे काय? एकंदरीत अवस्था खराब आहे. बी आर टी आणताना बी आर टी चा मार्ग बनवण्यासाठी मूळ रस्त्यांना कापण्याऐवजी मूळ रस्ते थोडे रुंद केले तर परिस्थितीत सुधारणा होईल.
चर्चेसाठी एखादा विषय घेणे आणि मग विरोधी मते आल्यावर 'आपला कोणी नातेवाईक रोड कॉंट्रॅक्टर तर नाही ना?' अशी शंका व्यक्त करुन टर उडवणे ही कोणती पद्धत?आपल्याला न पटणाऱ्या मुद्द्यांचे खंडन मुद्द्यांनी होते, 'अमक्याचा नातेवाईक आहे म्हणून तो त्या बाजूने बोलतो' असले बालिश युक्तीवाद करुन नाही, असे वाटते.