हरीहरेश्वर आणि गणपतीपुळे ही दोन्ही कोकणातील देवस्थाने. त्यामुळे तेथे भाविकांना तर पर्वणी आहेच पण कोकणाच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद मन भरून घेता येतो.  वादविवाद, ताणतणाव या सगळ्यांचा विसर पाडून मनाला अतंर्मुख करणारे निसर्गसौंदर्याचे सानिध्य मला सुखावून जाते. आपल्या वागणुकीमुळे निसर्गाचा समतोल बिघणार नाही याची काळजी तेथे जाणार्‍या पर्यटकाने घ्यायला हवी तरच महाराष्ट्रातील ही ठिकाणे देवस्थाने राहतील नाहीतर त्याचीही गत मुंबईच्या सागरकिनार्‍यासारखी व्हायला वेळ लागणार नाही.