प्रेमी जोडप्यांना समाजाचा जो दुष्टिकोन मिळतो तो योग्य नाही अस हि वाटत.

स्टेशनवर आणि ट्रेन मध्ये एकत्र असणारी जोडपी लोकांच्या नजरेत कोण हि

कारटी आणि काय चालू आहे यांच असाच असतो.यात मी घेतलेला अनुभव

साधारण २ वर्षा अगोदरची गोष्ट स्टेशनवर उभ्या असणाऱ्या एका हवालदाराने

आम्हाला विचारलं हा काय लवर्स पॉंईंट आहे.यावर मी काहीच बोललो नाही

नुसती मान डोलवली.यावरून मी इतका गोंधळलो होतो.

आम्ही काय आपेक्षाहार्त केलं याचा विचारत करत होतो

मग लक्षात आलं समाजाच्या दुष्टीकोनातून प्रेमी जोडप्यांनी हसणं खिदळण्याला

हि यांना बंधन हवी आहेत.दुसरा प्रश्न लवर्स पॉंईंट अस्तित्वात आहे का ? 

आमचं वागणं हि यांना एका गंभीर माणसासारखं हवं आहे का ?

यावरून आमचा अजूनच हट्ट चालू झाला स्वतःला जपण्याचा

मग हसण्या खिदळण्याला हि मर्यादा आली. हे योग्य की अयोग्य ते माहीत

नाही. पण तरुण वर्ग हि बंधन झेलू शकेल का ?

ज्यांना  प्रेमाचा एक हि दिवस ( व्हेलेंटाईन्स डे ) मुक्त पणे  साजरा करू देत

नाही हा समाज ते या समाजाचे किती नियम पाळणार आणि किती बंधन पाळणार ?

इतकं करणं हि जर ओबजेक्शनल असेल तर बाकीच्या गोष्टींसाठी पोलिस

कारवाईच योग्य. असो यावरून या कारवाईत काहीच न करणारे स्वतःची

मर्यादा ओळखणारे तलावाकडे, बागेत बसले तर त्यांच्यावर हि कारवाई होत

असेल हे नाकारता येत नाही. सगळेच अश्लील चाळे करत असतील हे

कस काय शक्य आहे. काही जण अश्लील चाळे करतात म्हणून सर्वच

जोडप्यांवर कारवाई व्हावी हे योग्य नाही. बापरे म्हणजे दोघांची हि

मानसिकता बदलायला हवी. मग प्रेमाची मर्यादा ठरवणाऱ्यांची आणी

दुसरी प्रेमाची मर्यादा ओलांडणाऱ्यांची. हा हा हा