येथे अनेक विषयांवर अनेक चर्चा होतात. त्यात बाष्कळ बडबड करणारेच जास्त दिसतात. काही कृती करुन मग बोलून दाखवणाऱ्यांच्या पेक्षा आज बेळगांवच्या बाजूने तर उद्या पाकिस्तानच्या विरुद्ध बोटे मोडणाऱ्यांचीच संख्या येथे जास्त दिसते.
फूटपाथवर झोपणाऱ्यांबद्दल कळवळा असलेल्यांपैकी किती जणांनी आपल्या घरातले वापरलेले कपडे बोहारणीला देण्याऐवजी गूपचूप एखाद्या प्लास्टिकच्या आसऱ्याशेजारी ठेवून दिलेले आहेत?
हे तर hypothetical उदाहरण झाले. ठोस उदाहरण द्यायचे तर --
येथे 'मराठीचा ऱ्हास होतो आहे, मराठीत कोणी लिहीत-वाचीत नाही, आंतरजालावर मराठीला वाव अथवा स्थान नाही,' असा टाहो फोडणारे अनेक आहेत. त्यांपैकी किती जणांनी मिलिंद भांडारकरांच्या शब्दभांडारात भर घातली? किती आक्रोशकर्त्यांनी मराठी विकिपीडियावर लिहायचा/वाचायचा चिकाटीने प्रयत्न केला? मराठी विक्शनरीवर किती जण शब्दार्थ, अन्वयार्थ लिहीतात? २ टक्के? ५?
याचकारणासाठी येथील बव्हंश चर्चांचा (मला तरी) आता उबग येतो. एकजण काहीतरी लिहीतो आणी दहा त्याच्यावरुन 'अमक्याने असे केले पाहिजे आणी तमक्याने तसे वागले पाहिजे' असे अनाहूत सल्ले देतात.
क. (जमले तर) लो. अ.
अभय नातू
असो. मला यावरुन शिव्याशाप देणारे अथवा माझ्याही चुका दाखवणारेही २५ सदस्य येथे असतील. त्यांनी माझ्यावर जरुर तोंडसुख घ्यावे. मी सर्वगुणसंपन्न नाही.