फूटपाथवर झोपणाऱ्यांबद्दल कळवळा असलेल्यांपैकी किती जणांनी आपल्या घरातले वापरलेले कपडे बोहारणीला देण्याऐवजी गूपचूप एखाद्या प्लास्टिकच्या आसऱ्याशेजारी ठेवून दिलेले आहेत?
फूटपाथावर झोपणारे येथे कोणी आढळत नाहीत परंतु जुने कपडे घेऊन जाणाऱ्या संस्थांना दर मोसमात कपडे देतो.
किती आक्रोशकर्त्यांनी मराठी विकिपीडियावर लिहायचा/वाचायचा चिकाटीने प्रयत्न केला?
आक्रोशकर्ती आहे का नाही ते माहित नाही, वाचावीर नक्की! गडबड-गोंधळवीरही आहे परंतु मराठी विकि वाचते. चिकाटीने का ते सांगता येणार नाही परंतु जमेल तसे योगदानही करते आणि मनापासून करते. (गेल्या दोन महिन्यांत काही वैयक्तिक कारणांमुळे शक्य झाले नाही, तरीही.) इतरांना विकिवर लिहा म्हणूनही सांगते.(बहुतांशवेळा अपयशी ठरते.)
मिलिंद भांडारकरांच्या शब्दभांडारात भर घातली?
एकाही नाही, परंतु मध्यंतरी त्यांच्या शब्दभांडाराला भेट दिली असता ते पाहून अतिशय कौतुक वाटले. ते जर एकाहाती हा प्रकल्प करत असतील तर कौतुकास्पद आहे.
मराठी विक्शनरीवर किती जण शब्दार्थ, अन्वयार्थ लिहीतात? २ टक्के? ५?
लिहावे अशी एका विकि सदस्याने विनंती केल्याचे आठवते परंतु मला ते अद्याप शक्य झालेले नाही.
हे उत्तर देण्याचे कारण की बरेचदा वाचन करताना किंवा लिहीताना मला थोडा ब्रेक (याला श्रमपरिहार म्हणावे का? विरंगुळा म्हणायचे नाही) लागतो तेव्हा येथे येऊन हमखास वाचाळपणा करते. मला ते ही मनापासून करायला आवडते.
'अमक्याने असे केले पाहिजे आणी तमक्याने तसे वागले पाहिजे'
असे सांगणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. बोलायला येण्याच्या आधीच लहान मूल रडून आईने काय करावे ते सूचित करत असते. :)) तेव्हा उबग आणून घेऊ नका. माणसांचे अनेक नमुने बघायला मिळतात ते काय कमी आहे?