इ.मा.वर्ग व मागासवर्गाच्या आमच्या महाराष्ट्रात किती जाती आहेत ते माहीत नसताना सुद्धा आरक्षणाविषयी आतापर्यंत आपण १५,१६ वर्षाच्या मुलाप्रमाणे हास्यस्पद असे काहीही लिहीत आला आहात आणि त्या जातींचा आरक्षणाशी संबध काय असे काहीबाही लिहून आपले अज्ञान दाखवून देत आहात.

इ.मा.वर्गाच्या एकूण ३३२ जाती आहेत व मागासवर्गाच्या एकूण ५९ जाती आहेत व त्यातही अनेक प्रकार आहेत व प्रकारानुसार त्यांची संख्या वाढते.

आरक्षण हा घटनेने दिलेला अधिकार आहे  कलम १४,१५,४६,३३५ आणि ३४० मध्ये त्यबाबत आपणास माहीती मिळेल व ती ही माहीती नसल्यास आपण तसे सांगावे. मी त्याबाबतही माहीती देईन.सर्व मागासवर्गियांना (नाहीतर आपल्याला वाटेल फक्त महाराष्ट्रातील मराठी दलित त्यातही धर्मांतरीत बौद्ध ) मिळणाऱ्या सवलती व त्यांच्या उद्धारासाठी शासन राबवीत असलेल्या योजना यांचे उगमस्थान किंवा स्रोत भारतीय राज्य घटनेतील वरील कलमांमध्ये आढळतो.

आपला

कॉ.विकि