काय काय अर्थ निघाले प्रत्येक शेरांतून. कमाल आहे. मस्तच, फारच आवडली. २ आणि ३ सुरेखच आहेत तरी खालील दोन शेर अधिक आवडले.

आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले

वाह! निदान आडून बोलणारे (किंवा बुरख्याआड दडणारे)  मारेकरी निघू शकतात हे कळले तरी खूप आहे.

कंपूत पांढर्‍यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!

वाह वा! इथे उडाली की इथेच राहिली? (हे वृत-बित्त सांभाळण्यासाठी नाही बरे का?)