हा तर मी लिहिलेल्या विनोदा पेक्षा हि मोठा विनोद होता.
इ.मा.वर्गाच्या एकूण ३३२ जाती आहेत व मागासवर्गाच्या एकूण ५९ जाती आहेत व त्यातही अनेक प्रकार आहेत व प्रकारानुसार त्यांची संख्या वाढते. आरक्षण हा घटनेने दिलेला अधिकार आहे.
काय संबंध असतील इतक्या जाती आणि आरक्षण हा घटनेने दिलेला अधिकार असेल.मग त्याचा चित्रपटात आरक्षण लागू करण्याचा आणि माझ्या विनोदावर निषेध करण्याचा काय संबंध.
आणि आरक्षण बद्दल माहिती दिलीच आहे तर त्याचे फायदे तोटे,आरक्षण किती वर्ष लागू आहे,होते ( कायद्यातले कलम हि दिले आहेत म्हणून विचारलं ) हि माहिती सुधा द्या.
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट लिहा. इतरांच्या माहितीसाठी सुधा.
आणि मी लहान असण्याची व्याख्या आधीच स्पष्ट केली आहे. मग तसे फायदे हि घेऊ द्या मला. शिकवा तुमच्या कडच ज्ञान.
असो तुम्ही हातच राखून लिहीत आहात हे स्पष्ट आहे. तुमचे स्वतःचे विचार काय ?
आणि मत काय ?
विनोदावर हि चर्चा होते आणि निषेध होतो हा अजून एक विनोद. हा हा हा.
हा विनोद इतक्या गंभीररीत्या घ्यावासा वाटत असेल तर तिथे हि आरक्षण लागू करू.
मग ओ.बी.सी. म्हणून मंगळावर जाण्याची संधी मला हि कधितरी मिळेल.
या विनोदावर अजून काही जणांना आक्षेप असेल तर माफी मागेन. पण आरक्षणावर
प्रेमी आणि हट्ट असणाऱ्यांसाठी माफी नाही मागणारं.