एक तर एकुणं जातींची संख्या माहीत. तुम्हाला माहीत आहे म्हणून आरक्षणाच समर्थन करता आहात का ? कुठल्या हि जातीत स्वतःचा विकास न झालेली माणस आहेत म्हणून ती जात वर आणण्याचा आरक्षण हा एकच मार्ग आहे का ?

त्याचे फायदे तोटे स्पष्ट न करता मिळतंय ना आरक्षण मग त्याच समर्थन करायचं मग ते कसही करायचं. दुसऱ्याला कमी माहिती आहे हे दाखवून किंवा दुसऱ्याला खाली पाडून.

मी बस मध्ये असता ना बाजूला बसलेल्या दोन माणसाचं म्हणणं ऐकतं होतो.

१ ला माणूस काय रे उदास का असा गप्प गप्प का बसला आहेस.

२ रा माणूस अरे मी ओपन मध्ये येतो ना म्हणून कामात बढती नाही मिळणार.

असे किती तरी प्रश्न आरक्षणामुळे निर्माण झाले आहेत ते काय याबद्दल माहिती नाही म्हणून दुर्लक्ष करायचे. इतिहासा पेक्षा जरा चालू असलेल्या प्रश्नांकडे आणि आरक्षणामुळे निर्माण झालेल्या वादाकडे बघा. स्पर्धा हवी या मताचा मी आहे म्हणून आरक्षणाला विरोध.

पण जातीतल्या लोकांना अशा प्रकारे पुढे करून दुसऱ्यांवर अन्याय करताय त्याच काय ? या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा स्पर्धेत पळण्यासाठी स्वतःची जात दाखवण्यापेक्षा  स्वतःच कर्तृत्व दाखवा.

 आरक्षणाच समर्थन का याच तुमच्या कडूनं एक हि वाक्यात स्पष्टीकरण मिळाल नाही याच आश्चर्य.

कस आहे आपल्याला त्या त्या विषयाचे ज्ञान नसेल तर उगाचच त्या विषयाबद्दल लिहू नये तर माहिती मागावी.

खरंच ती माहिती देण्याची आवश्यकात नाही. तुमचं १० -२० वर्षा अगोदरच्या माहिती पेक्षा सध्याची परिस्थिती आणि प्रश्न जातीच पांघरुणं दूर करून सोडवावेसे वाटले तर तसं कळवा मग चर्चा करू. तो पर्यंत चर्चा शक्य नाही. नुसते वाद होतील आणि माझ्यासाठी हा विषय कायमच विनोदी राहिलं. खाजगी क्षेत्रात आरक्षण नसत मग तिथे काय करायचं तिथे स्वतःचा आणि स्वतःच्या समजाचा विकास कसा होईल या कडे लक्ष द्या. कारण सर्वच क्षेत्र खाजगी होत आहेत.

अर्थात जमलं तर विचार करा. नाहीतर आरक्षण असण्या नसण्याच्या वादात आणि अपेक्षेत स्वतःचा आणि स्वतःच्या समाजाचा विकास करायचा राहूनं जाईल.