घूस म्हणाली हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे; तसेच घुशी हे अनेकवचनही मान्य आहे. पण त्याच घुशीला (इथे घुसीला म्हणायचे नाही असे वाटते, ते माझ्या कानाला खटकते आहे. ) उपहासाने जर आदर द्यायचा असेल तर त्याचे घुशी होईल असे मला वाटले म्हणून घूस म्हणाली याऐवजी घुशी म्हणाली असे केले. त्याच वजनात बसणारा कोणताही बिळात/ अडगळीत लपून रहाणारा प्राणी घेता येईल:)
दारवान आणि छापखाना हा शेर न समजायला कठीण आहे असे मला वाटले नाही, कदाचित स्पष्ट झाला नसावा. कारकून स्वतःच्या छापखान्यात जात होता, चौकीदाराला तो ओळखू आला नाही म्हणून त्याने अडवले. कारकुनाला आत जाता आले नाही म्हणून काही छापता आले नाही..
तबल्याच्या शेरात संबंध चटकन लावता येईल असा शेर नाहीच म्हणून दुसरी ओळ कंसात आहे.
प्रतिसादासाठी आभारी आहे.