घुशी हे घूस चे अनेकवचन होते, तसेच संबोधनही होते असे वाटते. तसेच म्हशीचेही आहे.  उदा. अग अग म्हशी मला कुठे नेशी. येथे म्हशी हे म्हैस ह्या शब्दाचे संबोधन आहे. पण म्हशी म्हणाली असे म्हणत नाहीत, म्हैस (प्रथमा विभक्ती) म्हणाली असेच म्हणतात. त्यामुळे घुशी म्हणाली हे अजूनही खटकतेच आहे. इतर विभक्तीप्रत्यय लागताना स चा श होईल हे बरोबर. उदा. घुशीला, म्हशीला, घुशीने, म्हशीने वगैरे.

दारवान - छापखान्याचा शेर आता समजला. धन्यवाद.