निनाद रावांची बाळबोध उत्तरे वाचून मला ठकठक या लहान मुलांच्या मासिकातील हसू नका बरे हे सदर आठवले.त्यांना काहीही माहीती नाही आहे. लिहायचे म्हणून लिहायचे व आरक्षणाला विरोध करायचा या एकमेव हेतूने निनादराव काहीही लिहीत सुटले आहे.
निनादरावांची ज्ञानपरीक्षा- १) छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्लक्षीत समाधी कोणी शोधून काढली व शिवजयंती सर्वप्रथम कोणी सुरू केली. २) स्री- शिक्षण सर्वप्रथम कोणी सुरू केले.ज्यांनी सूरू केले त्यांचे साहित्य तुम्ही वाचले आहे का तसेच त्यांची हिंदू धर्मातील जात कोणती व आता स्वांतंत्र्य भारतात त्यांची जात कोणत्या आरक्षीत वर्गात मोडते.३) दुर्बल घटकांना आरक्षण प्रथम स्वातंत्र्यपुर्व भारतात कोणत्या राजाने केले. ४)राज्यघटनेचे शिल्पकार कोण ? त्यांची मातृभाषा कोणती होती ? पुर्वाश्रमीची त्यांची जात कोणती. त्यांची आतापर्यंत किती पुस्तके तुम्ही वाचली आहेत. ५) स्वतंत्र भारतामध्ये आरक्षण किती साली लागू झाले व त्याची आतापर्यंत अंमलबजावणी कश्याप्रकारे झाली.६) अजूनही जातीव्यवस्था नष्ट का झाली नाही. अजूनही २१ व्या शतकात खैरलांजी सारख्या घटना का घडतात. दुर्बल मागास घटकांवर होणारे अत्याचार व त्याच अनुषगांने त्यांना लागू झालेले आरक्षण याचा तुम्ही संबंध कोणत्या प्रकारे लावाल. ७) आपणाला आतापर्यंत आरक्षण मागासवर्गामधील कोणत्या जातीला मिळते असे वाटत होते व का?
आरक्षणक्षणाचे कट्टरविरोधक माननिय निनाद यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी त्यांना नम्र विनंती.
आपला
कॉ.विकि