फायदे तोटे स्पष्ट न करता मिळतंय ना आरक्षण मग त्याच समर्थन करायचं मग ते कसही करायचं. दुसऱ्याला कमी माहिती आहे हे दाखवून किंवा दुसऱ्याला खाली पाडून.
मी लिहिलं होत ना १०-२० अगोदरचा इतिहास माझ्यासमोर नका मांडू. तुम्ही तर त्या अगोदरचा इतिहास माझ्यासमोर मांडला. असो त्याचा आरक्षणाशी काय संबंध आणि अगोदरच्या प्रश्नाचा आरक्षणाशी काय संबंध ते अजून स्पष्ट नाही तुमचे प्रश्नोत्तर चालूच आहेत.
तुमच्या या अगोदरच्या आताच्या आणि या नंतर येणाऱ्या प्रश्नांची खरंच माझ्याकडे उत्तर नाहीत पण जमलं तर माझ्या एकाच प्रश्नाच उत्तर द्या आरक्षणाबद्दल एवढं प्रेम का ? जातीचा विकास होण्यासाठी आरक्षण हा एकमेव मार्ग आहे का?
आणि ठकठक या लहान मुलांच्या मासिकेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.तसंच काहीस वाटत आहे तुम्हाला त्यातल्या शेवटच्या पानावरचे कोड सोडवण्याची सवय झाली आहे वाटत त्यात भरपूर मार्ग शोधून खरा मार्ग मिळतो.
असो तुमच्या कडे माझ्या प्रश्नाची उत्तर नाहीत आणि माझ्याकडे तुमच्या प्रश्नाची उत्तरे नाहीत मी ५ ते १० वी च्या इतिहासांतली प्रश्न सोडवतो आहे का सध्याच्या परिस्थितीची हा गोंधळ. विकी यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे एकाद्या इतिहासाच्या पुस्तकात मिळतील. पण त्याचा आरक्षणाशी काय संबंध हे मिळणार नाही. असो ते स्वतः पटवू शकले तरी पुष्कळ.
तुम्ही आरक्षणच समर्थन करा मग ते इतिहास दाखवून करा आम्ही विरोध करतो ती सध्याची परिस्थिती दाखवून यात कोणाला काय घ्यावेसे वाटते हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. तेव्हाची परिस्थिती काय आताची परिस्थिती काय यात विकीयांना आरक्षणाचे तोटे दाखवुन देण्यास मी कुठे तरी कमी पडलो.
उशिरा का होईना पण हे शहाणपण सुचलं आहे त्यामुळे हा विषय इथेच थांबवतो आहे.