तुमचे प्रेमात पडण्याचे कारण केवळ ती तरुणी सुंदर दिसते एवढेच असेल तर तुम्ही तिच्यासमोर प्रेम व्यक्त न करणेच शहाणपणाचे ठरेल. तुमचा स्वभाव तिला आणि तिचा स्वभाव तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही केवळ ती सुंदर दिसते म्हणून प्रेमात पडला असाल तर तुमच्या शब्दात तुम्ही अजून फार लहान आहात. उद्या दुसरी अधिक सुंदर मुलगी दिसली तर तिच्याही प्रेमात पडाल. तुमचे प्रेम केवळ सुंदर असण्यावर आधारीत आसेल तर ते नक्कीच टिकाऊ नसेल. तेव्हा तुम्ही ब्रम्हचारी आहात तेच बर आहे.