अजून ऐकू तिला न येई तुझे तराणे, तुझी कहाणी
भरून आहे तिच्या कदाचित अजून कानी जुनी विराणी
वा वा. ओळी अजून सहज करता आल्या तर ? 'अजून' भरीचा वाटतो
म्हणायला राहिलीत मागे कुंवारतेची फुलं सुगंधी
फळाफळातून वेल गाते दुरावल्या प्रीतिचीच गाणी
कुंवारतेची च्या ऐवजी कौमार्याची केले तर?
विषाद याचा मला नसे की तिने कोरडा नकार द्यावा ( असे केले तर मुखातुन चा घोळ टाळता येऊ शकेल)
उरेल आजन्म दु:ख हे की कडाडली, हाय, शापवाणी
वृत्त मोठे असल्याने शब्दांचे बरेच पर्याय उपलब्ध होतील त्यामुळे अर्थाला धक्का न लावता बदल करता आले तर पहावे.
गझल आवडली.