हुजूरपागेतल्या पण चांगल्या असतात पण थोड्याशा शिष्ट वाटतात.
थोड्याश्या ह्या शब्दावर आक्षेप आहे. तसेच चांगल्या असतात म्हणजे काय असतात हे जाणून घ्यायचे आहे.

माझ्या मते ह्या शिष्टपणाचा संबंध 'हुजूरपागा'तल्या 'पागा' ह्या शब्दाशी असावा. तिथे जाऊन तिथल्या मातीचाआणि हवेचा अभ्यास करावा लागेल. असो. रेणुका स्वरूप (पूर्वीची भावे) मधल्या मुली ह्या चतुर, गृहकृत्यदक्ष असतात पण आगाऊ नसतात, असा अनुभव आहे. रेणुका स्वरूप हे साधारणपणे थोड्या उच्च मध्यमवर्गीय मुलींची शाळा. त्यामुळेही असेल. असो. आपण एक फार महत्त्वाची चर्चा सुरू करून एक मोठ्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

गडकऱ्यांच्या 'काय करावे?' कवितेत थोडा बदल केला तर ती त्यांना लागू पडते असे वाटते -


उन्हाळ्यासाठी पाणी न ठेवून | नदी वेगे जाता पळून |
भक्कम दगडांचे धरण बांधून | तिला अडवता येतसे || १ ||

अगदी आपला नेम धरून | तोफ सुटता धडधडून |
हळुच बाजूला सरून | मारा चुकविता येतसे || २ ||

अंतराळी कडकडून | वीज घरावरी पडता तुटून |
उंच खांबांत बांधून | पाताळी सोडिता येतसे || ३ ||

सावकारांनी वैर धरून | जप्ती आणिता दावा करून |
मागील बाकी देऊन | तिला उठविता येतसे || ४ ||

अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून |
एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || ५  ||

जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |
कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे || ६ ||

सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून |
हुजूरपागा कडकडून — | येता, काय करावे? || ७  ||