सन्जोप, मी इथे एक वेगळा सूर लावतो आहे, माफी असावी. दिवाकरांच्या नाट्यछटा त्या काळात जरी तत्कालीन वेगळ्याच फॉर्ममुळे उठून दिसत असल्या, व त्यांचा मानवाच्या वागण्यातल्या विसंगतींवर नेमके बोट ठेवण्याचा हेतू सफ़ल झाला असला, तरी मला तरी असे वाटते की त्या फॉर्मची गंमत तेव्हढयाचपुरती आहे. त्यांचे कौतुक करावयाचे ते त्यांच्या काळाच्या संदर्भात.परंतु आज जर कुणी हा असला लांबलचक soliloqy वर आधारीत फॉर्म वापरू लागले, तर ते खूपच कृत्रिम वाटेल. कदाचित हेच कारण झाले असेल का कुणीहि हा फॉर्म नंतर न वापरायला?