मानवाच्या वागण्यातल्या विसंगतींवर नेमके बोट ठेवण्याचा हेतू सफ़ल झाला असला, तरी मला तरी असे वाटते की त्या फॉर्मची गंमत तेव्हढयाचपुरती आहे. त्यांचे कौतुक करावयाचे ते त्यांच्या काळाच्या संदर्भात.

सर्वच विसंगतींवर बोट ठेवून केलेले उपहासात्मक किंवा उपरोधात्मक भाष्य समाजाकडून तितक्या सहजपणे पेलले जात नाही. विसंगती ही विसंगती म्हणून समाजात आधीच मान्यताप्राप्त असेल तर ते अधिक सहजतेने पेलले, स्वीकारले जाते; अन्यथा समाजाला न जाणवलेली विसंगती दाखवणाऱ्या लेखनाकडे दुर्लक्ष होण्याचीच शक्यता जास्त. कदाचित अलीकडच्या काळात असे दुर्लक्ष, उपेक्षा पदरात पाडून घ्यायला लेखक तयार नसावेत.

आज जर कुणी हा असला लांबलचक soliloqy वर आधारीत फॉर्म वापरू लागले, तर ते खूपच कृत्रिम वाटेल.

मुळात तो नाटकी / नाट्यपूर्ण आणि म्हणून कृत्रिम आहेच - ते केवळ एक स्वगत आहे. एरवी तोंडातून बाहेर पडणार नाही अशी मनात चाललेली विसंगत विचारांची कसरत आहे.

नाट्यछटेव्यतिरिक्त अशी विसंगती किंवा अंतिम कलाटणी 'सुनीत' ह्या काव्यप्रकारात अत्यंत प्रभावीपणे दाखवून देता येते. अनेक अर्वाचीन कवींनी (आणि केशवकुमारांसारख्या त्यांच्या विडंबनकारांनी) हे दाखवून दिलेले आहे.