तुमचे दोन्ही किस्से खुप छान आहेत. तुमच्या हॉटेलच्या प्रसंगावरुन माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली. आम्हि ११वी मधे होतो आणि college मधे 'sari day'  होता म्हणुन काही सौंदर्य प्रसाधन आणायला गेलो होतो. माझ्या मैत्रिणीनि दुकानदाराकडे 'eye liner' मागितलं, दुकानदारानी विचारलं, "Gala (brand name)"  चं देऊ का? त्यावर माझी मैत्रिण त्यावर म्हणाली , "नको गालाचं नको, फक्त डोळ्यांचं द्या"!!!!!! हा प्रसंग आठवुन आम्हि आजहि तिला खुप हसतो.