कदाचित अलीकडच्या काळात असे दुर्लक्ष, उपेक्षा पदरात पाडून घ्यायला लेखक तयार नसावेत.

हे मानणे मला कठीण जाते. अलिकडच्या काळात, म्हणजे विशेषतः ६०- ७० च्या दशकांत, तेंडुलकर, एल्कुंचवार व सतिश आळेकर ह्यांच्यासारख्या नाटककारांनी नेटाने असे विषय हाताळले आहेत. 'स्थळ: दिवाणखाना'तून मराठी नाटकाला बाहेर काढण्यात ह्या नाटककारांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. दुर्लक्ष, उपेक्षा वगैरेंकडे लक्ष न देता त्यांनी नाटके लिहिली.