माझ्या मतानुसार सद्य स्थितीत ज्या संज्ञा कॉम्प्यूटर हार्डवेअर , नेटवर्कीग आणि कोडींग यांच्याशी संबंधित आहेत त्या तशाच ठेवून त्यांच्या भोवती मराठी भाषेचे कोंदण घालून संगणकीय भाषा वापरावी. अचानक सर्व संज्ञा मराठीतून मिळाल्या तर त्या दूर्बोध वाटण्याची शक्यता आहे. कारण सध्यातरी त्या संज्ञा इंग्रजीतूनच वापरल्या जात आहेत. काळाच्या ओघात अशा कठीण संज्ञांची यादी बनवून त्यावर भाषा तज्ज्ञ, महाराष्ट्र ज्ञान मंडळा सारखी एखादी संस्था व संगणक तज्ज्ञ यांनी मिळून शब्द निश्चिती करावी व काही काळ अशा दोन्ही संज्ञा (इंग्रजी कंसात ठेवून) वापराव्या आणि मराठी संज्ञा रुढ झाल्यानंतर पुढील आवृत्त्यांमध्ये इंग्रजीची आवश्यकता देखील भासणार नाही.