ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य पांढरपेशा माणसाची. त्याला एक न्यूनगंड आहे. की तो त्याच्या, त्याच्यापेक्षा सुंदर असलेल्या बायकोचं संरक्षण करण्यास असमर्थ आहे. आणि त्यातूनच त्याच्या मनात रिक्षावाल्याची काल्पनिक भीती निर्माण झाली आहे. त्याचा न्यूनगंड आणि ही काल्पनिक भीती ह्यांचं पर्यवसान अखेरीस त्याच्या वेडं होण्यात होतं. आपला अंदाज अचूक होता. पण संपूर्ण नाटक इथे लिहिणं शक्य नव्हतं फक्त अनुभव तेवढा मांडायआ होता.