माझे वय अंदाजे १०-११ वर्षांचे असेल. त्यावेळी मी रहात असलेल्या सहनिवासामधे, एका सदस्याने दुसऱ्या सदस्याबद्दल एक तक्रारपत्र सहनिवासाच्या सूचना फलकावर लावलेले आठवते. हे गृहस्थ भयंकर भांडकुदळ म्हणून प्रसिध्ध होते.

त्यातले एक वाक्य अजून आठवते. " श्रीयुत XXXX ह्यानी सहनिवासाच्या अनुमतीशिवाय धष्चोटपणे अतीरिक्त नळाची जोडणी केली व आमचे पाणी तोडले" !!

धष्चोट ह्या शब्दाची त्याकाळी फार गंमत वाटली होती! कोणास अर्थ ठाऊक असल्यास सांगावे.

धन्यवाद,