नमस्कार.

माझा आरक्षणाच्या संकल्पनेला विरोध नाही. आपल्या देशात सर्व मागासजातींचा विकास नक्कीच झालेला नाही. त्यांना मदतीची आवश्यकता आहेच. पण एकावरचा अन्याय दूर करताना दुसऱ्याच्या मनांतही अन्यायाची भावना निर्माण होता कामा नये. मोजक्या सीटसाठी जिथे स्पर्धा आहे तिथे सर्वांना समान संधी हवी. सीट मेरिटवर मिळाल्यानंतर पैशावाचून शिक्षण अडू नये म्हणून मागासवर्गीयांना संपूर्ण फी माफी असावी. या पद्धतीला कोणाचाच विरोध रहाणार नाही.