प्रभाकरपंत,
सध्याचे युग भेसळीचे आणि शुध्दतेचा आग्रह न धरणारे आहे. सर्वच भाषा या चक्रातुन चाललेल्या आहे. इंग्रजी भाषेत सुध्दा ज्या पध्दतीने संक्षिप्तीकरण आणि इतर भाषेंचा सहभाग चालला आहे, त्यामुळे २५ वर्षापुर्वीची आणि २५ वर्षानंतरची इंग्रजी भाषा यात आकाश-भुमी इतके अंतर असणार हे नक्की. त्यामुळे शुध्दतेचा आग्रह अनाठायी राहील असे वाटते. अहो, जेथे शिक्षकच अशुध्द लिहतात / बोलतात तेथे मुलांनी तरी कोणाचा आदर्श धरावा ?
त्यामुळे आहे त्या परीस्थितीत मराठी वाचवण्याचा ध्यास घ्यायला हवा असे मला वाटते.
द्वारकानाथ