श्री. द्वारकानाथ,
युग भेसळीचे आहे म्हणून हात-पाय गाळून आणि दिवसेंदिवस र्हास पावणार्या इंग्रजी भाषेला आदर्श मानून मराठी भाषेच्या र्हासाचा वेग वाढविण्यास आपण हातभार लावावा हे अयोग्य आहे. भाषेत बदल हा होणारच. आपल्या सर्वांना हे मान्य आहेच. समर्थ रामदासांच्या काळातील मराठी भाषा आपण जपूया असा माझा आग्रहही नाही. मी श्री. सुनिल यांना त्यांच्या 'शुद्ध की प्रमाणित' या मुद्द्याला दिलेला 'शब्दच्छल नको' हा प्रतिसाद पुन्हा उद्घृत करतो, त्यात माझी भूमिका जास्त स्पष्ट आहे:-
'शुद्ध' की 'प्रमाणित' असे म्हणून नविन वादाला तोंड फोडता येईल. पण माझ्या सूचने मागे तसा उद्देश नाही. अगदी 'आनीबानीच्या कालात पानी मिलत नाही' किंवा 'न बानाचा म्हन' असे मराठी नको. र्हस्व-दीर्घ आणि जोडाक्षरे यावर थोडे लक्ष दिले तर 'मनोगता'वर मराठी 'सुसह्य' होईल असे मला सूचवायचे आहे.
धन्यवाद.