सोनाली, जीएस्, राधा, मृदुला आणि श्रावणी
सहनशील वृत्तीने, मी लीहीलेली, प्रदीर्घ कथा वाचून आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
राधा,
कावळ्याचे आयुष्य असते का हो एवढे ? २० - २५ वर्षे ??
कावळ्याचे आयुष्य सर्वसाधारणपणे २० ते २१ वर्षे असते. जास्तीत जास्त २९ वर्ष ६ महिन्यांची नोंद आहे.
... मुलीची आणि कावळ्याची मुले पण एकाच वयाची, हे नाही पटले.
हा मुद्दा मान्य. कावळ्याच्या जन्माच्या वेळी 'चिमुरडी' ४-५ वर्षाची होती. विसाव्या वर्षी तीचे लग्न झाले तर कावळा १५ वर्षाचा असायला पाहीजे. कावळ्याचे सहचरण आणि पिल्ले कथेत बर्याच आधी यायला हवे होते. ही एक तांत्रीक चूक आहे कथेत. त्या बद्दल मी दिलगीर आहे. आपण माझी ही चूक निदर्शनास आणून दिल्या बद्दल धन्यवाद.