अहो, तुम्ही ज्या धीराने या प्रसंगाला सामोऱ्या गेलात ते कौतुकास्पद आहे. माझी मुलगीही अमेरिकेत असते. नशिबाने ती चांगल्या शहरांत आणि मैत्रिणींमधे आहे.  तुमचा अनुभव वाचून असे मनांत आले की निदान त्या मराठी कुटुंबाने तरी त्यांच्या घरांत तुम्हाला सामावून घ्यायला हवे होते. प्रश्न फक्त ६ महिन्यांचाच होता ना ? एखादी स्त्री एकटी तळघरांत राहती आहे या कल्पनेने सुद्धा मला झोप येणार नाही.