क्या बात है! झकास.

कोठे तरी मिळावी मदिरा मला सुखाने

शोधू अजून सांगा येथे किती दुकाने
  -मिळेल, मिळेल, सध्या तू जिथे वास्तव्याला आहेस तिथे पावलोपावली ही दुकाने असतात. चिंता नसावी.

होतो इथे निघालो शोधात 'बाटली'च्या
वाटेत लागली ही दुग्धालये ढिगाने
  -अशा क्षुल्लक अडचणी जिज्ञासूंच्या मार्गात येतच असतात. त्यावर मात करून ध्येय गाठण्यात खरा पुरुषार्थ, आय मिन, बाटल्यार्थ, आहे. तेव्हा, आगे बढो, केशवा, हम ( इन स्पिरिट )(पन इंटेंडेड ) तुम्हारे साथ है !

त्या मैफिलीत गेलो तिथली ठमा म्हणाली
आता हुजूर तुम्ही खाली बसा गुमाने
  - अरे, त्या आनंदीबाईंनी 'ध' चा 'मा' केला तसा तू 'र'चा 'ठ' करून घोळ घातलास! पोचलास ना भलतीकडे!

माझ्याच बायकोला आलो न ओळखू मी
(थोबाड रंगलेले  होते तिच्या मुक्याने)
  - वीजकपातीमुळे दिवे गेले असतील, नाही ?

सोडू नका अता या निर्लज्ज "केशवा"ला
तुडवून आज काढा त्याला जरा बुटाने
  - तथास्तु