माहिती तंत्रज्ञानात मराठी वापरणे मुळीच अवघड वाटू नये. आपण नेहमी मातृ भाषेतून विचार करत असतो. त्यामुळे नवीन काही समोर आले म्हणजे त्याच्या विषयी आपल्या मनात प्रथम पासूनच मातृ भाषेतून प्रतिक्रिया निर्माण होत असली तरी ती भाषा जर अन्य असेल आणि त्या विषयी पुरेसे ज्ञान नसेल तर पटकन न आठवणाऱ्या शब्दांना पर्याय शोधत न बसता तो जसाच्या तसा वापरा नंतर बघता येईल.  उदा. सेव्ह फाइल, कट-कॉपी-पेस्ट, इत्यादी. मराठीत पर्याय सापडतीलही परंतु या क्षणी त्याच्यावर वेळ न  घालवता प्रथम ते शिकून आत्मसात करा नंतर सवडीने मातृभाषेतून विचार करू. प्रवेशालाच नकार घंटा वाजवत बसलो तर काहीही साध्य होणार नाही.