वनस्पतिशास्त्रात प्लाझमाला प्राकल म्हणतात. प्लाझमा-मेम्ब्रेन--प्राकल-पटल.   प्लाझ्मोडियल स्टेज--प्राकलावस्था.  असेच प्राकलतंतु, प्राकलकुंचन, प्राकलपुंज, बाह्यप्राकल(एक्टोप्लाझम) वगैरे शब्द वनस्पतिशास्त्र-शब्दकोशात दिले आहेत. इथे प्राकल म्हणजे जीवद्रव्य.  'ब्लडप्लाझ्मा'तला प्लाझमा  किंवा घन, द्रव किंवा वायुरूपात नसण्याची आयनीभूत अवस्था हे अर्थ वनस्पतिशास्त्रातल्या प्लाझमाला लागू पडत नाहीत. इंग्रजीमध्ये तिन्ही प्रकारच्या प्लाझम्याला प्लाझमा म्हणत असतील तरी मराठीत वेगवेगळे शब्द असू शकतात.  अर्थात 'प्लाविका' एका प्रकारच्या 'प्लाझमा' करिता उत्कृष्ट शब्द!