फॉर्क म्हणजे, जेवणासाठी चमच्याबरोबर वापरतात तो काटा असा साधा अर्थ. फॉर्कलिफ्ट म्हणजे अवजड वस्तू उचलण्यासाठी असे दोन मजबूत पोलादी कांटेर असलेले, चार चाकावर चालणारे यंत्र. अवजड वस्तूच्या खाली ही दोन कांटे (फॉर्क) सरकवून यांत्रिक बळाने ती वस्तू उचलता येते आणि इच्छित ठिकाणी नेता येते. वस्तू इच्छित ठिकाणी नेली गेली की कांटे (फॉर्क) पुन्हा खाली करून वस्तू पुन्हा जमीनीवर ठेवता येते.