लेखाचे सहाही भाग आवडले. उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. ऊर्जेसंबंधी माहिती तुम्ही सोप्या शब्दामध्ये उत्तम समजावून सांगितली आहे.

पाठ्यपुस्तकातील काही पारिभाषिक शब्द असे -

फिशन - विखंडन
फ्यूजन - संमिलन
(विदलन आणि संदलन हे शब्द अर्थाच्या दृष्टीने योग्य असले तरी वरील शब्द प्रचलित आहेत.)
हाफ लाईफ - अर्धायुष्यकाल (तुम्ही अर्धायुष्य म्हटले आहेच, पाठ्यपुस्तकामध्ये पुढे काल असे जोडलेले आहे.)

कार्बन डाय ऑक्साईड साठी कर्ब-द्वि-प्राणिल असा शब्द आहे, प्राणिद नव्हे. प्राणिद ह्या शब्दाचा अर्थही वेगळा होतो. 

हरितकुतीबद्दल इतरांनी सांगितले आहेच. हरितगृह हा प्रचलित शब्द आहे.