स्वातंत्र्याच्या साठीतही आव्श्यक्ता भासावी हेच मूळी हास्यास्पद आहे. आपल्या शैक्षणिक विकासाचे ते अपयश आहे. आरक्षणामूळे इतरांच्या निकोप विकासावर गदा येते. पात्रता असुनही जेव्हां एखादि संधी नाकारली जाते तेव्हांच आरक्षणाची धग कळते. आरक्षणाला पर्याय आहे. तो म्हणजे शिक्षण घेत असतांना दुर्बल घटकांना जातीच्या आधारावर नव्हे तर आर्धिक निकशाच्या आधारावर सर्व सोयी सवलती उपलब्ध करून त्यांची बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न करायला हवेत. जेव्हां नोकरीची संधी येते तेव्हां सर्वांना सारखेच निकष लागू व्हावेत. तीच गोष्ट सेवा काळातील पदोन्नतींच्या बाबतीत लागू व्हावी. तेथे सेवा ज्येष्ठता आणि कार्यक्षमता हीच पात्रता असावी म्हणजे कुणीही नाराजिने वा पराभूत मनस्थितिने काम न करता जबाबदारीने करील. वरिष्ठ जर कामात खरोखरच हुशार असेल तर कनिष्ठांवर डोळेझाकून विश्वास ठेवणार नाही आणि योजनांच्या अंमलबजावणीचा फज्जा उडणार नाही.