याचे खरे श्रेय माझ्या आखातातील वास्तव्यात मला लाभलेला परम मित्र वसंत गडकरी उर्फ 'वश्या डोंगऱ्या' यालाच द्यावे लागेल. या माझ्या मित्राची ओळख मी वाचकांना 'आखाती मुशाफिरी भाग (७)' आणि 'मध्यांतर' मध्ये करून दिलेली आहेच. ती खूपच कमी वाटावी असें तें बहुआयामी व्यक्तिमत्व होते. माझ्या अनेक सुखदु:खाच्या क्षणी वश्या माझ्याबरोबर नेहमीच माझा कृष्ण बनून राहिला होता. मला भगवद्गीतेची ओळख वश्यामुळेच झाली.

हरून